बंद घरातून चोरट्याने दागिने लांबविले!

शहरातील कुंभार गल्ली, वॉर्ड तीनमधील बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील व लोखंडी पेटीतील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कुंभार गल्ली येथील मोहनलाल हजारी व्यास १ जानेवारीपासून भिलवाड (राजस्थान) येथे त्यांच्या भावाच्या मुलाचा मुंज कार्यक्रमासाठी सहकुटुंब गेले होते. यादरम्यान त्यांचे बंद असलेले घराचे कुलूप तोडून कपाट व लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यात असलेले काही रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात व्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.