आसाममध्ये पुराचे थैमान, परिणामी अभयारण्यातून अनेक प्राणी वाट चुकले

वाघांसारख्या शिकारी प्राण्यांवर आता ड्रोनची नजर

गुवाहाटी : देशातील दुसरे सर्वात मोठे वाघाचे राखीव क्षेत्र मानस राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. शिकारीवर टाच आणल्यानंतर आसाममध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2022 नुसार राज्यात वाघांची संख्या वाढून ती 227 झाली. 2006 मध्ये या ठिकाणी फक्त 70 वाघ होते. जगातील 80 टक्के वाघ हे फक्त भारतातच आढळतात.सध्या बदललेल्या वातावरणानुसार आसाममध्ये धुवाधार पाऊस झालेला आहे. त्यामुळे अभयारण्यातून अनेक जनावरे आपली वाट चुकलेली आहेत. धुवाधार पावसामुळे अनेक जनावरांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. परिणामी अशातच या ठिकाणी असलेले वाघसुद्धा वाट चुकलेले आहेत. भक्षांच्या शोधात या वाघांची आगेकुच आता गावांमध्ये झालेले आहे. परिणामी गावातही मानवी वस्त्यांमध्ये अशा प्राण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ते लाओखोवा आणि बुरहाचापोरी अभयारण्यापर्यंत रॉयल बंगाल टायगर आपले राखीव वनक्षेत्र सोडून बाहेर पडतात. ते मानवी वस्तीत पोहोचतात. मात्र आता पहिल्यांदाच या वाघांची निगरानी ड्रोनद्वारे केली जात आहे. वनाधिकारी जयंत देकाय यांच्या मार्गदर्शनाखाली वाघांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. वनविभाग त्यांच्या हालचालींच्या आधारे त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सावध करत आहे. मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष कमी करणे. हा त्यामागचा हेतू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आता मानव-प्राणी संघर्ष रोखण्यात नक्कीच प्रशासनाला यश येताना दिसत आहे.