अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी अनिल कटके यांची नियुक्ती 

नगर एलसीबीला मिळाले कायमचे अधिकारी 

अहमदनगर :

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले अनिल कटके यांची नियुक्ती झाली आहे.  अलीकडच्या काही वर्षांत तत्कालिन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीची उंची खूप वाढवली आहे.
पवार हे पुणे ग्रामीणला बदलून गेल्यानंतर ही खुर्ची रिकामीच होती. नाही म्हणायला शिशिरकुमार देशमुख यांच्यावर प्रभारी निरीक्षकाची जबाबदारी होती.   मात्र आता कटके यांच्या रुपाने अहमदनगर एलसीबीला कायमचे अधिकारी लाभले आहे. 
आता पवार यांच्या तुलनेत कटके यांची कामगिरी कशी राहते, त्यांच्या कालखंडात किती गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात, दरोड्याच्या तयारीत असलेल्या किती टोळ्या जेरबंद केल्या जातात, याची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.