ऋषिकेश राऊत
अहमदनगर प्रतिनिधी :-
किरकोळ कारणातून महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना नगर शहरात घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सय्यद (वय २५ रा. झेंडीगेट, नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
मंगळवारी सकाळी फिर्यादी त्यांच्या वडिलांना जेवण घेऊन गेल्या असताना सय्यद हा तेथे त्याची गाडी लावत होता. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाल्या, माझ्या वडिलांचे वय जास्त झाले आहे, त्यांना चालता येत नाही, तू येथे गाडी लावू नकोस. असे म्हणताच सय्यद याला त्यांचा राग आला.
त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांचा विनयभंग केला आहे. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ गेला असता त्यांना देखील सय्यद याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे..