वंचित बहुजन आघाडी अगामी काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. :-  रेखाताई ठाकूर  

नगर, जामखेड, शेवगाव तालुक्यातील महिला व तरुणांचा वंचित मध्ये जाहीर प्रवेश.


ऋषिकेश राऊत
अहमदनगर (प्रतिनिधी)

 

अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व महानगर पालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली.

येथील आशीर्वाद लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या संघटन, समिक्षा व संवाद मेळाव्याच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, गोविंद दळवी, प्रदेश महासचिव अरुंधती ताई क्षिरसाठ, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सविता ताई मुंडे, भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक, ऍड. डॉ. अरुण जाधव, अहमदनगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, पक्ष निरीक्षक रविंद्र आरु, ऍड.अरविंद तायडे, जेष्ठ सल्लागार प्रा. जीवन पारधे आदी यावेळी उपस्थित होते.


यावेळी बोलतांना रेखाताई ठाकूर पुढे म्हणाल्या की, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ग्राम पातळीपासून जिल्हा पातळी पर्यंत सभासद नोंदणी अभियान व ग्राम शाखेचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे.

प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, राज्याच्या राजकारणाला हादरे देणारा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीने अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली. प्रस्थापित सरंजामशाहीला मोठ्या धाडसाने सामोरे जाण्याचे बळ आदरणीय बाळासाहेबांनी आम्हांला दिले आहे. अगामी काळात ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत आपली माणसे सत्तेत गेली पाहिजे. त्यासाठी एक जुटीने काम करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घर तिथे सभासद मोहीम राबविली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योग्य नियोजन करून शिव तंत्राचा वापर करून राजकीय लढाई लढली पाहिजे. श्रद्धा, सबुरी आणि सय्यम ठेवल्यास आपण नक्की यशस्वी होऊ. पक्ष वाढविण्यासाठी जनतेच्या विविध प्रश्नावर आंदोलने केली पाहिजेत, असे ते म्हणाले.

यावेळी प्रदेश महासचिव अरुंधती ताई शिरसाठ, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता ताई मुंडे, भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक ऍड. डॉ. अरुण जाधव यांचीही भाषणे झाली.

महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून या मेळाव्यास प्रारंभ झाला. प्रतिक बारसे यांनी प्रास्ताविक केले. ऍड. अरविंद तायडे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश साठे यांनी आभार मानले.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी फिरोज पठाण,  कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, जामखेड तालुकाध्यक्ष आतिष पारवे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख,  पाथर्डी तालुकाध्यक्ष रविंद्र म्हस्के, संतोष गलांडे, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अहमदनगर दक्षिण व उत्तर जिल्ह्याच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या मेळाव्यास कावेरी शिला शेख यांच्यासह बौद्ध,मातंग,मुस्लिम, ख्रिस्त,भिल्ल समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर शहरातून स्तुती सरोदे, शीतल शरवाल, मोनाली साळवे, स्मिता सगळगिले, पूनम दळवी, सुवर्ण साठेसह 200 महिलांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शेवगाव तालुक्यातील नवनाथ सातपुते तळणी गावचे सरपंच,हाजी शेख मोहम्मद हनीफ तांबोळी, रविन्द्र सर्जे,कैलास बोरूडे,बाळू थोरात,शेख अस्लम बाबा, डॉ. अंकुश गायकवाड, महीला- रोहीणी ठोंबे, सुनिता जाधव, मनिषा आरक तसेच  जामखेड तालुक्यातील गणपत आबा कराळे, सर्जेराव गंगावणे, अजिनाथ शिंदे, किशोर मोहिते, कदीर मदारी, सोहेल मदारी, कल्याण आव्हाड, यशवंत काकडे, विष्णु चव्हाण, मोहन शिंदे, बाबाजी चव्हाण, सुदाम शेगर आदींनी यावेळी जाहीर प्रवेश केला.