इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात

मुंबई :  
 
पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांचे पाचव्या दिवशी देखील दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे, तसेच गेल्या दोन महिन्यांपासून पंजाबमध्ये हे आंदोलन सुरु आहे.  आता इंग्लंडचा एक माजी दिग्गज क्रिकेटपटू या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने उभा ठाकला आहे.
 
इंग्लंडचा माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसर याने ट्विट करुन शेतऱ्यांचं समर्थन केलं आहे, तसेच त्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारला सवाल केला आहे. पानेसरने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “जर खरेदीदार किंवा व्यापारी शेतमाल खरेदी करताना म्हणाला की, आपलं कंत्राट पूर्ण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सांगण्यात आले होते, तशी या शेतमालाची गुणवत्ता नाही. अशा परिस्थितीत शेतकरी काय करतील. शेतमालाची किंमत ठरवण्यासाठीचा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही”.
 
पानेसरने अजून एक ट्विट केलं आहे, त्यात त्याने म्हटलं आहे की, “शेतकरी तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, हे कायदे एमएसपी सिस्टिम संपवतील. या कायद्यांमुळे शेतकरी बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या दयेवर विसंबून राहील”. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.