का वाढतेय आपल्या जिल्ह्यात बिबट्यांची संख्या ? 

अहमदनगर (प्रतिनिधी) : 
 
नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत आहे.  ही जरा चिंतेची बाब बनली आहे. मागील आठवड्यात नगर शहरापासून जवळच असलेल्या चांद बिबी महालाच्या पायथ्याला बिबट्याची जोडी सापडल्याने घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.  दररोज सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी हजारोच्या संख्येने नगरकर या परिसरात येत असतात . पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असतात . मात्र आता या परिसरात सर्वांचे फिरणे देखील बंद करण्यात आले आहे. तसा फलक या परिसरात लावण्यात आला आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या का वाढली त्याचा शोध वन्य प्रेमी व वन खात्यातील तज्ञांच्या अभ्यास गटाने घेतलाय.
संख्या का वाढते आहे  आणि बिबट्याचा वावर मानवी वस्तीकडे का वाढला आहे .
पाळीव पशू पक्षाबरोबर तो मानवावर हल्ला करून बिबट्या नरभक्षक का बनतो आहे या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या अभ्यास गटाने केला तेव्हा त्यांनी खालील निरीक्षणे नोंदवली.
१) बिबट्या हा प्राणी मार्जार कुळातील असल्याने मांजरी प्रमाणे दरवर्षी बिबट्याची मादी गरोदर राहते व ती ५ ते ६ पिलांना जन्म देते.
२) बिबट्याचा मृत्यू सरासरी १० वर्षांनी होतो .
३) बिबट्याची साधारण १ ते दीड वर्षात शरीराची पूर्ण वाढ होते . आणि तो प्रजनन करण्यासाठी अनुकूल होतो.
४) दरवर्षी ५ च्या पटितील वर्गवारीत बिबट्याची संख्या यामुळे वाढते आहे.
५) महाराष्ट्रात वाघांची संख्या जास्त नसल्याने अन्न साखळीत बिबट्या सर्वोच्च स्थानावर आहे .
६) या परिसरातील जंगलात बिबट्या सहसा कुणाचे खाद्य होत नसल्याने त्याच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
७) लॉक डाऊन च्या काळात गावकरी घरात होते अगदी आदिवासी भागात देखील याची कडक अंमल बजावणी झाली . त्यामुळे बिबट्याचा मानवी वस्ती जवळून धाडसी वावर सुरू झाला .
८) मानवी वस्तीवर हल्ले करताना त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली.
९) वाढत्या संख्येमुळे जंगलात खाद्याची कमतरता भासल्यास अन्नाच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीकडे आकर्षित होऊ लागला आहे .
१०) वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे प्रत्यक्ष जंगलांचे आकारमान कमी होणे. या कारणांनी बिबट्या मानवी वस्तीजवळ सहजपणे दिसू लागला आहे.