भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही

डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही

भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही.डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत.कोणतेही सर्व्हे येवू द्यात,मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पारनेर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे प्रा.विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड, सोनाली चालके, बंडू रोहकले, बाबासाहेब खिलारी, सचिन वराळ, रवींद्र पूजारी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,लोकसभा निवडणुक ही देशाची आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे.मागच्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनाचा लाभ सामान्य माणसापर्यत पोहचवला.जे प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जावून सांगत आहोत.इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोव्हीड संकटात डॉक्टर नात्याने आपणही हजारो रुग्णांची सेवा केली.पण समोर रूग्ण मरणांशी झुंज देत असताना त्याच्यावर उपचार करतानाचे व्हीडीओ टाकण्याचा मोह आपल्याला कधी झाला नाही आणि होणारही नाही असे सांगून डुप्लीकेट व्हिडीओ करून राजकारण करण्याची पध्दत आमची नाही.विखे पाटील परीवार लोकंमध्ये जावून काम करतो.या जिल्ह्यातील लोकांच्या सुख दुखात सहभागी होवून लोकांचे पाठबळ मिळवतो.प्रेमाच्या आणि जीवाभावाच्या लोकांमुळेच विखे परीवाराला राजकारणात अनेक वर्ष संधी मिळाली.त्यामुळे आमचा सर्वे लोकांच्या मनात आहे.कोणाचेही सर्वे येवू द्यात अहिल्यानगर मतदार संघातून महायुतीचाच विजय होणार आणि पारनेर तालुक्यातून सर्वाधिक मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा खा.सुजय विखे पाटील यांनी केला.

खोट्या सहानुभूतीला यापुर्वी पारनेर तालुका फसला.आता पुन्हा ती चूक या तालुक्यातील जनता करणार नाही असा विश्वास व्यक्त करून या तालुक्यातील जनतेने आता विकास कामाची तुलना करण्याची गरज आहे.दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.काम कमी आणि व्हिडीओच जास्त आशी परिस्थिती तालुक्याची असल्याचा टोला लगावून पारनेर हा विचरांचा तालुका आहे. जनता सूज्ञ आहे.एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य घडवविणारी आहे.तशीच पारनेर तालुक्याच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण आहे.या भागातील युवकांचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे.समृध्द सुशिक्षित आणि सुरक्षित पारनेर करीता आपल्या सर्वाच्या सहकार्याने काम करायचे असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.