रतडगावला लोककलावंतांसह मतदार जागृती

मतदान शंभर टक्के होणे गरजेचे -अ‍ॅड. भानुदास होले

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

रतडगाव (ता. नगर) येथे लोककलावंतांनी लोकगीते सादर करुन ग्रामस्थांमध्ये मतदार जागृती केली. तर मतदान व स्वच्छतेचे महत्त्व सांगून गावात स्वच्छता अभियान राबविले. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. (महाराष्ट्र राज्य) व उडान फाउंडेशनच्या वतीने मतदार जागृती अभियान व स्वच्छता पंधरवडा अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

 

 

 

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, मतदार दूत डॉ. अमोल बागुल, जय असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, राज्य युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे, हभप अ‍ॅड. सुनिल तोडकर, उद्योजक शरद वाघमारे, शाहीर कान्हू सुंबे, रयतचे पोपट बनकर, कारभारी वाजे, डॉ. धीरज ससाणे, सागर आलचेट्टी, रजनी ताठे, संदीप वाघुले, ऐश्‍वर्या बनसोडे, शुभम शिंदे, उडान फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, सचिव अक्षय शिंदे, भारती शिंदे आदी उपस्थित होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

अ‍ॅड. भानुदास होले म्हणाले की, मतदान शंभर टक्के होणे गरजेचे आहे. लोकशाही मजबुतीसाठी विकासासाठी मतदान प्रक्रियेत मतदारांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. मतदान प्रक्रियेकडे उदासीनतेने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यासाठी जागर महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमोल बागुल यांनी 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवती महिला यांनी नमुना सहाचा फॉर्म भरून मतदार म्हणून नोंदणी केली पाहिजे. तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन मतदार नोंदणी करता येते. आपल्याला मत रुपी मिळालेला अधिकार बजाविला तर नक्कीच गावाचा विकास होणार असल्याचे सांगून, कोणत्याही प्रलोभनाला व दबावाशिवाय मतदान करण्याचे आवाहन केले.

 

 

उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी कोरोना महामारीच्या काळात स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा उपयोग, सामाजिक अंतर या सूत्राचा वापार केल्यास कोरोनापासून सुरक्षित राहता येणार असल्याचे सांगितले. प्रारंभी अ‍ॅड. होले यांच्या हस्ते उडान या सामाजिक संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.   शाहीर कान्हू सुंबे, कारभारी वाजे, अ‍ॅड. सुनिल तोडकर यांनी प्रबोधनात्मक  लोक गीते सादर केली. यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, अ‍ॅड. अनिता दिघे व रमेश गाडगे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.