वडारवाडी ग्रामपंचायत च्या प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी नवबौद्ध घटकांच्या विकासकामे वस्तीत न करता इतर ठिकाणी कामे केल्या असल्याचा आरोप.
माजी उपसरपंच कैलास पगारे यांच्या तक्रारीला अधिकाऱ्यांची केराची टोपली.
माजी उपसरपंच कैलास पगारे यांच्या तक्रारीला अधिकाऱ्यांची केराची टोपली
नगर (प्रतिनिधी)- शहरानजीक असलेल्या वडारवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कैलास पगारे यांनी पुराव्यासहित अनेक वेळा वरिष्ठांना निवेदने दिलेली आहे. की प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या खोटे प्रस्ताव तयार करून अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या विकासकामे वस्तीत न होता इतर ठिकाणी कामे करत आहे निविदा प्रक्रिया प्रशासनाच्या नियमानुसार न करता शासनाच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन स्वताचे आर्थिक फायद्यासाठी ठेकेदारांशी सगम मत करून निधीचा दुरुपयोग करण्याचा कुटील डाव केलेला आहे व ग्रामपंचायत वडारवाडी प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शासकीय नियमानुसार निलंबलाची कारवाई करून अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या विकास कामांमध्ये फसवणूक केलेल्या प्रकरणी संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेले ओपन स्पेस सरकारी मालकीची जागा ही मौजे भिंगार तलाठी कार्यालयाकडून इतर दुसऱ्या व्यक्तींच्या नावे करण्यात आलेली आहे त्याची देखील चौकशी करण्यात यावी व दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अनेकदा पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापही करण्यात आली नसून येत्या २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.