अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन

अन्यथा आयुक्तांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा

अहमदनगर

दीड महिन्यापासून बंद असलेला कोठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य भाजीपाला विभाग मंगळवार दि.1 जून पासून पुर्ववत सुरू करण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. सदर मुख्य भाजीपाला विभाग सुरु न केल्यास आयुक्तांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे यांनी दिली.

हे  अवश्य पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा

 

   गेल्या दीड महिन्यापासून कोठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजीपाला विभागा बंद आहे. संपुर्ण राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना देखील, दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, बंगलोर आदी मोठी शहतील महापालिका हद्दीतील भाजीपाला बाजार आरोग्य विभाग व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त यंत्रणेमार्फत योग्य नियोजन व नियमांचे पालन करून सुरु आहेत. बाजार सुरू ठेवणे गरजेचे असताना, फक्त गर्दी म्हणजे संसर्ग हा निष्कर्ष योग्य नसल्याचे म्हंटले आहे. सदर प्रश्‍नी लवकरात लवकर निर्णय घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य भाजीपाला विभाग पुर्ववत सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सर्व असोसिएशनचे सभासद, आडते व्यापारी, दिवाणजी, हमाल-मापाडी, शेतकरी मनपा आयुक्तांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.