जिजाऊ हास्य योगा फौंडेशनने मकरसंक्रातीला आगळ-वेगळ हास्य हळदीकुंकू

न भुतो न भविष्यती ५०० महिलांनी प्रथमच गाण्यावर ताल धरला

नगर- अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध जिजाऊ हास्य योगा फौंडेशन ने मकरसंक्रातीला आगळा वेगळा हास्य हळदीकुंकू सांस्कृतिक मोहोत्सव साजरा केला. नेहमी काहीतरी वेगळे करण्याची जिजाऊ ग्रुपची परंपरा आहे. हास्य’ हे सर्व रोगांवस्चे रामबाण औषध आहे. ते पण विनामुल्य मिळते, तसेच देऊ शकतो. ही संकल्पना जिजाऊ ची आहे. योगा तसेच इतर शारीरिक व्यायामाबरोबस्व हास्य योगा हा महत्वाचा भाग आहे.
     जिजाऊ फौंडेशनच्या संस्थापिका मनिषा गुगळे निरंतन नवे काही उपक्रम करतात. अहिल्यानगर येथील बडी साजन मंगल कार्यालयात मकरसंक्राती निमित्त जिजाऊ ग्रुपने ‘ये शाम मस्तानी’ हा संदिप भुसे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. संजय गुगळे (स्नेहालय). यांनी केले. योगाचा दैनंदिन जिवनावर होणारा प्रभाव त्याचे फायदे महत्त्व त्यांनी सांगितले. त्यानंतर गायिका रोहीणी आरोही यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या गिताने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर अभय कांकरीया यांच्या ‘कई बार युही देखा है’ या  मधुर गिताने रंगत आणली. डॉ. सत्तार सय्यद यांच्या  बार बार देखो  गीतावर महिला वर्गाने ठेका धरला. विद्या तन्वर यांनी दिल तो है दिल हे बहारदार गीत सादर केले. संदिप भुसे यांच्या फुलोंके रंग से या गिताने मंत्रमुग्ध केले.
      या कार्यक्रमात अभय कांकरीया यांनी मैंने तेरे लिए, मेहबुब मेरे, एक दिन बिक जायेगा ही श्रवणीय गीते सादर केली. डॉ. सत्तार यांनी पुकारता चला है, आके तेरी बाहोंमें, ही गीते सादर केली. संदिप भुसे यांनी चित्रपट कलाकारांच्या आवाजावर मिमिक्री सादर केली. त्यांनी गायलेल्या देखा जो तुझे यार, गुलाबी साडी, झिंगाट या गाण्यांवर सर्व महिला वर्गाने मनमुराद डान्स सादर केला.
      गीतांची संध्याकाळ खऱ्या अर्थाने रंगावी आणि कोणतीही महिला खुर्ची वर बसून न राहता सक्रीय सहभागी व्हावी, यासाठी, मनिषा गुगळे यांनी कार्यक्रमात सादर होणार असलेल्या काही गाण्यांवर महिलांना नृत्य करता यावे आनंद घेता यावा यासाठी कोरीओग्राफर बोलावुन सर्व महिलांना नृत्यांचे धडे दिले. वय वर्षे १५ ते ८५ अशा सर्व महिलांना, यात सहभाग घेतला. न भुतो न भविष्यती अंदाजे ५०० महिलांनी प्रथमच गाण्यावर ताल धरत धमाल केली. गाणान्या कलाकारांना अनोखी सलामी मिळाली.
      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिला सहदेव, हेमा गुगळे, ज्योती भंडारी, सुरभी भळगट, यांनी विशेष परिश्रम घेतले.