गणेशपुर मध्ये फुलणार जालना जिल्ह्यातील पहिली फुलपाखरू बाग

पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटक निसर्गासाठी महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. त्यात फुलपाखरांची संख्या ही कमी झाली आहे. त्यामुळे रंगबिरंगी फुलपाखरांसाठी जागतिक निसर्ग निधी भारत व केशवराज शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यावतीने जालना तालुक्यातील गणेश पुर येथे जिल्ह्यातील फुलपाखरू बाग साकारण्यात येणार आहे. पर्यावरण दिन शेतकरी व मुलांनी अडीच एकरावर फुलपाखरांना आवडणाऱ्या फुलझाडांची लागवड केली आहे गणेशपुर गावात शाश्वत जमीन व पाणी व्यवस्थापन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गणेशपुरी येथील हुतात्मा स्मारकाच्या परिसरातील मोकळ्या जमिनीवर फुलपाखरू बाग तयार करण्यात आली. याबाबत फुलपाखरू वास्तव्य करणाऱ्या आणि त्यांना आवडणाऱ्या विविध प्रजातींच्या वीस प्रकारची 155 फुलझाडे लावण्यात आली. या बागेसाठी गावातील शेतकरी शाळेतील मुले मुली व ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी श्रमदान केले पावसाळ्यात ही बाग फुलणार असून परिसरात फुलपाखरांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. निसर्गावर आधारित उपाय या मूळ संकल्पनेच्या अंतर्गत या बागेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यांचे संगोपन ग्रामपंचायत करणार आहे. यासाठी डब्लू डब्लू एफ इंडिया व केशवराज ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याची माहिती तुषार थेटे यांनी दिली. या प्रकल्पासाठी उपसरपंच राजाभाऊ कळकुंबे, डब्ल्यूडब्ल्यू एफ इंडियाचे मुकेश त्रिपाठी महेश पाटील वीरेंद्र बंबुरे सचिन गायकवाड, शरद खेडेकर, प्रवीण एकुंडे, शिवशंकर सापा यांनी परिश्रम घेतले.