जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
अहमदनगर :
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात ६ मे पर्यंत विजांच्या कडकडाटसह वादळी वारा, गारपीट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना, झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये . विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, गडगडाटीच्या वादळा दरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये. तसेच अवकळी पाऊस वादळी वारा, व गारपीट मुळे शेतीमलचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. त्याचप्रमाणे विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.