स्नेहांकुर मधील बालकांसाठी आवश्यक विविध वस्तूंचे वाटप
केडगाव येथील रंगोबा मित्र मंडळ व सह्याद्री मित्र मंडळाच्या वतीने स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातील बालकांसाठी विविध आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक सुनील कोतकर यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
तसेच शहरातील अरुणोदय गो शाळेत उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आले. नगरसेवक मनोज कोतकर, माजी सरपंच पराजी चितळकर, उद्योजक जालिंदर कोतकर, भूषण गुंड, सोनू घेंबूड, अजित कोतकर, अमित येवले, मुकुंद बोरकर, महेश दळवी, विशाल नाकाडे, सचिन शिंदे, निलेश सत्रे, राजू कोतकर, रोनित कोतकर, तुका कोतकर, भाऊ कोतकर, वैभव तापकिरे, सोमा कराळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील कोतकर म्हणाले की, समाजातील वंचित घटकांना सहानुभूतीपेक्षा आधार देण्याची गरज आहे.
स्नेहांकुर मधील मुले समाजातील एक घटक आहे. त्यांना प्रवाहात आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आजही मुले हे उद्याचे भविष्य असून, त्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. समाजाला देणे लागते, या भावनेने प्रत्येकाने आपल्या परीने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.