ओबीसींच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नये

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

आरक्षणाच्या नावाखाली सर्व समाजांना एकमेकांविरुद्ध लढवले जात आहे.आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे.ओबीसींचे जे नेते आहेत.त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये तुम्ही मंडलाबरोबर नाही,कमंडलाबरोबर आहात.मग ते छगन भुजबळ असतील किंवा शेंडगे असतील.आरक्षण हा काही विकास नाही तर आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे.आजचे आरक्षणवादी आहेत ते आरक्षण विरोधी आहेत.असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या संविधान सन्मान महासभेत केला. सभेला मोठी गर्दी झाली होती.ओबीसींचे ताट वेगळे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे पाहिजे.शासनाच्या धोरणामुळे प्रत्येकाला असे वाटते की,आरक्षण मिळाले पाहिजे आणि विकास झाला पाहिजे.असेही ते यावेळी म्हणाले.