नाजूक करण्यावरून तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना सावेडी उपनगरातील नंदनवननगर येथे घडली. योगेश पांडुरंग धनवटे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. धनवटे यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबवरून सोमवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कैलास तोडकर, पवन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Next Post