पोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.

शिवाजीनगर न्यायालयात पोलिसांनी केले होते आरोपींना हजार

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.  सिंहगड रस्ता, हिंगणे, नवले ब्रीज परिसरात वाहन चालकांना लुटणाऱ्या आरोपींना  पोलिसांनी अटक केली होती . आरोपी नामे विनोद शिवाजी जामदारे (32, रा. जाधवनगर, वडगांव), रोहित विकास शिनगारे (19, रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (22, रा. बार्शी, जि. सोलापूर), गौरव गंगाधर शिंदे (रा. मु.पो. ताडसौदने, ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि नितीन सुरेश जोगदंड (35, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांना  २१ डिसेंबर रोजी सिंहगड रोड पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती.  आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची तपासकामी पोलीस कोठडी सुनावली.  मुदत संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले व 5 दिवसांची पोलीस कस्टडीची मागणी केली . त्यावेळी पोलिसांनी केलेल्या  काही तांत्रिक चुकांमुळे अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे, आरोपीला स्वतःवर काय गुन्हा माहीत असणे गरजेचे आहे , सदरील बाब आरोपींचे वकील यांनी न्यायालयाच्या लक्षात आणुन दिली. कायद्याच्या अंतर्गत पोलीस कोठडी देता येणार नाही. असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने ॲड. आदेश चव्हाण यांनी केला. त्यांना विशेष सहाय्य ॲड. सुलेमान शेख यांनी केले.  युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीचे आदेश केले.