प्रत्येक तीन पैकी एक व्यावसायिक ए आयच्या चिंतेने ग्रस्त

मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम

केवळ दोन तासात वैज्ञानिक संशोधन लेख लिहिण्यापासून ते गुगलची कोडींग मुलाखत करण्यापर्यंत एआय बाॅटस् आता अनुभवी व्यवसायिकांमध्ये तणाव निर्माण करत आहे. एआय मानवी मेंदूचा वापर न करता मानवी क्रियांचे अनुकरण करण्यास समक्ष सक्षम आहे. सामग्री लेखनापासून ते कोडींगपर्यंत सर्व गोष्टींमध्ये एआयचा वापर केला जात आहे. उदा. डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म बज फेड ने अलीकडेच घोषणा केली की, ते कंटेंट लिहिण्यासाठी एआय वापरतील. एवढेच नाही तर नेटफ्लिक्सने जनरेट केलेल्या आर्ट वर्कच्या मदतीने संपूर्ण ॲनिमेशन फिल्म बनवली आहे. अशा स्थितीत व्यावसायिकांना एआयपासून आपल्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे वाटणे स्वाभाविक आहे. त्याला ‘एआय चिंता’ असे नाव दिले आहे. कीन आणि कार्टाच्या नुकत्याच प्रकाशित अहवालानुसार 94% व्यावसायिक नेते आहे चिंतेचा सामना करत आहेत. याशिवाय काम ॲपच्या संशोधनानुसार दर तीन पैकी एक व्यावसायिक एआय च्या चिंतेने ग्रस्त आहे.