महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यामंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिव प्रा. सुनील जाधव, किशोर डागवले, जालिंदर बोर्डे दत्ता गाडळकर, आनंद पुंड व्यवहारे मुख्याध्यापक राजकुमार शिंदे उपस्थित होते. श्री संत सावता आश्रम शिक्षण मंडळाच्या माध्यमातून महात्मा फुले विद्यामंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात येत असल्याचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.