मेडिकल दुकानाची भिंत फोडून चोरी करणारा जेरबंद

शहरातील मीरा मेडिकलची भिंत फोडून आज प्रवेश करत काउंटर मधील ३५००० हजारांची रोख रक्कम चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं हा खेळ शाखेने जेरबंद केला. गुलाब उर्फ गोलाट्या श्रीखंड चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी तेलीखुंट येथील मीरा मेडिकल दुकानाची भिंत फोडून चोरट्याने रोकड लांबवली होती. याप्रकरणी मोहम्मद कमाल शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकरराव, राजेंद्र वाघ, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, भीमराज खडसे, रवींद्र घुंगासे, अमृत आढाव व प्रशांत राठोड यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. सदर गुन्हा गुलाब चव्हाण यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.