प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात का?; मायावतींचं उदाहरण देत राऊतांचं स्पष्ट उत्तर

लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते. अशात जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत. जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात का, असा आरोप केला जातो. यावर तुमचं काय मत आहे?, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकरांचे पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते. पत्रकार होते. उत्तम पत्रलेखक होते. त्यांचा वारसा प्रकाश आंबेडकर लिखाणामध्ये चालवत असतील, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आंबेडकर पत्र उत्तम लिहितात वाचायची असतात, असं संजय राऊत म्हणाले.