अरणगावमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव अरणगावमध्ये  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अरणगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा १५ फुटी पूर्ण कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. ‘जय भवानी- जय शिवाजी’  च्या घोषणा देत युवकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

लाल बावटा कामगार युनियनचे सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर व अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विजय भोसले, सुभाष शिंदे, संदीप शिंदे, नवनाथ भिंगारदिवे, विकास कांबळे, मयूर थोरात, प्रवीण शिंदे, अक्षय शिरवाळे, संदीप कांबळे, पंढरीनाथ मुदळ, राजेंद्र मोरे, सागर पवार आदींसह गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.