एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण
तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजाच्या विविध मागण्या संदर्भात....
कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजाच्या विविध मागण्या संदर्भात ‘एकलव्य आदिवासी परिषद संघटने’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे, योगेश माळी, प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, पप्पू खुटसणे, विजय केळ, शोभा सोनवणे, कुल्याबाई पवार, उमेश बोर्डे, प्रमोद बारहाते, रवींद्र साळुंखे, संदीप ससे, संकेत सोनवणे, अनंत वाघ, मंगल पवार, अशा वाघ आदीसह आदिवासी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
