टेम्पो चालकाला बेदम मारहाण

घोडेगाव बाजार येथून टेम्पो चालक जावेद नवाब इनामदार यांनी जनावरे गाडीत भरुन अहमदनगर येथे सोडण्याचे भाडे घेतले होते.  सदर टेम्पो मध्ये जनावरे भरून घोडेगाव येथून नगर हायवे अहमदनगर कडे येत असताना टेम्पो जेऊर टोल नाक्याजवळ आला असता, भगत चांगदेव, सिद्धार्थ कराळे, भूषण भिंगारदिवे, नवनाथ भगत, बबलू उर्फ संदीप भगत, ज्ञानू दानी, अतुल कराळे, योगेश सतीश शिंदे, विकास चव्हाण, अरुण कराळे, अतुल पोपटराव वारुळे, किरण मच्छिंद्र चौरे, वैभव शिवाजी मुंगसे, गौतम कारले, विशाल काढे, किरण गुंड, रवी पवार व गणेश ज्ञानदेव हूलावळे आदी सह १५ ते २० अनोळखी यांनी माझा टेम्पो थांबून मला सांगितले की तुम्हाला येथून म्हशी घेऊन जायचे असतील तर आम्हाला पैसे द्यावे लागतील नाहीतर आम्ही तुमच्यावर पोलीस स्टेशनला जनावरं कत्तलीचा खोटा गुन्हा दाखल करु  व टेम्पो मधील सर्व जनावरे पांजरपोळ मध्ये पाठविणार अशी धमकी दिली.

त्यानंतर नवाब इनामदार यांनी सांगितले की, माझ्या टेम्पोमध्ये सर्व म्हशीचे टोंनगे असून ते मी कत्तलीला घेऊन जात नाही असे सांगितले असता त्या गोष्टीचा सदर इसमांना राग येऊन सदर इसमांनी मला गाडीतून बळजबरीने खाली उतरून स्कार्पिओ मध्ये बसून एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी वरील सर्व लोकांनी लाकडी दांडक्याने हाताने बेदम मारहाण केली. तसेच तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यातील गौतम कारले, किरण गुंड व रवी पवार यांनी माझ्या खिशातील ३५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच इतर व्यक्तींनी माझे महत्त्वाचे कागदपत्र ही हिसकावून  घेतले. सदर व्यक्ती मला मारहाण करीत असताना त्यांचे एका साथीदाराने त्यांना सांगितले की सदर गाडीच्या क्लिनर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेला आहे आपण याला जीवे ठार मारले तर आपल्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होईल म्हणून त्यांनी मला पोलीस स्टेशन येथे आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. व पोलिसांनी मला झालेल्या गंभीर दुखापतीचा विचार करून मला शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले व मी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलीस माझा जबाब घेण्यासाठी आले होते परंतु पोलिसांनी माझे सांगण्याप्रमाणे जबाब नोंदवण्यास नकार देऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे मला जबाब देण्यास सांगत होते . मी त्यांचे सांगण्याप्रमाणे जबाब न दिल्यास त्यांनी माझा जबाब नोंदवण्यास नकार दिला.

या विषयात नमूद केलेले इसमांनी केलेले हे कृत्य गंभीर स्वरूपाचे असून दखलपात्र गुन्ह्यात मोडणारे आहे असे असताना देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे  दखलपात्र गुन्हा नोंदवण्याचे विचारात असल्याचे पोलिसांच्या वर्तणूक यावरून स्पष्ट होत असल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे धाव घेऊन दिलेल्या निवेदना द्वारे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अर्जदार जावेद नवाब इनामदार यांनी केली आह.