ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा
अहमदनगर : मेट्रो न्यूज : केडगाव
केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले.
जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी हनुमान चालीसाचे पठण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, उद्योजक सचिन कोतकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण कर्डिले आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. अध्यक्ष कर्डिले यांनी मंदिरासाठी व महाप्रसादासाठी देणगी देणार्या भाविकांचे आभार मानले.