राज्यस्तरीय मंथन परीक्षेत नवीन मराठी प्राथमिक शाळेतीचे तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले

या पालक व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड :राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळेचे इ. ५ वी तील श्रेयसी भोसले, आयुष बोधले व अथर्व शिरसाठ हे तीन विद्यार्थी चमकले आहेत. त्यामुळे या तीनही विद्यार्थीसह त्यांना मार्गदर्शन करणार्‍या पालक व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सोपे जाईल या उद्देशाने शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळा हे आपल्या शाळेतील इयत्ता २ री ३ री, ४ थी, ५ वी व इयत्ता आठवी मधिल विद्यार्थी हे सामान्य ज्ञान परीक्षा, स्कॉलरशिप व एनएमएमएस परीक्षेस बसवत आसतात. यासाठी वर्षभर इयत्ता २ री पासूनच शाळेत जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे दरवर्षी शाळेचा उत्कृष्ट निकाल लागण्याची परंपरा आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत इयत्ता पाचवी मधिल तीन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता चमकले आहेत. या मध्ये श्रेयसी युवराज भोसले हीस ३०० पैकी २९४, आयुष अविनाश बोधले ३०० पैकी २९२ व अर्थव अजिनाथ शिरसाठ ३०० पैकी २८८ मार्क मिळुन राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या विद्यार्थ्यांना नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात मॅडम,श्रीम. महाजन ए. आर , श्री.भांगरे एस. एम. व श्री.बांगर एस. एम. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. राळेभात मॅडम व सर्वच मार्गदर्शक शिक्षकांचे कैतुक केले आसुन सर्व मुलांचे संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने उमेश (काका) देशमुख, बंडोपंत पवार, लक्ष्मीकांत देशमुख, राजेंद्र देशपांडे व जामखेड पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन केले आहे.