चिखली ता श्रीगोंदा येथे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व बेलवंडी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी खोटी रेड करून गुन्हा न दाखल होण्याकरिता ७ लाख रुपयांची केली मागणी.

मौजे चिखली ता.श्रीगोंदा येथील हॉटेल निसर्ग येथे २५ नोव्हेंबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व बेलवंडी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी खोटी रेड करून गुन्हा दाखल होण्याकरिता ७ लाख रुपयांची मागणी केल्याबाबत तसेच खोटे जप्ती पंचनामे करून विकत आणलेले ७७२ लिटर डिझेल जप्त केले आहे. त्यामुळे न्याय मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर अमरण उपोषण करण्यात आले यावेळी गणेश झेंडे, संदीप दळवी, राहुल भास्कर, किरण गाडेकर आदी उपस्थित होते.                   २५ नोव्हेंबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच बेलवंडी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हॉटेल निसर्ग येथे रेड केली असता त्यांना  काही नाही सापडले त्यानंतर माझ्या रूम मध्ये ठेवलेले माझे विकत पेट्रोल पंपावरून आणलेले ७७२ लिटर डिझेल  त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी वरील अधिकारी व कर्मचारी यांनी हॉटेलचे मॅनेजर यांना सदर डिझेल बाबत विचारणा केली असता त्यांनी वरील अधिकारी यांना सांगितले की सदर डिझेल हे जनरेटर, जेसीबी, ट्रॅक्टर व स्वतःच्या गाडी तसेच काम चालू असल्याने साठा आणून ठेवला आहेत तरीसुद्धा वरील सर्व अधिकारी यांनी माझे मॅनेजर यांना दमदाटी करून सदर चे डिझेल हे बायोडिझेल आहे तरी आमच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल न होण्याकरिता ७ लाख रुपये आम्हाला सर्वांना द्यावे लागतील त्यानंतर वरील सर्व अधिकारी यांनी मॅनेजर यास दमदाटी करून हॉटेल मध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यास सांगितले परंतु मॅनेजर यांनी न घाबरता सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले नाही त्यानंतर माझे मॅनेजर राहुल याचा मोबाईल नंबर अधिकारी यांनी दमदाटी करून जप्त केला त्यानंतर त्यांनी मॅनेजरच्या फोनवरून मला फोन लावले वरील अधिकारी यांनी ७ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर एलसीबीचे घुंगासे व नवगिरे यांनी मला ऑडिओ व्हिडिओ कॉल करून ७ लाख रुपयांची मागणी केली. बेलवंडी श्रीगोंदा निरीक्षक यांना  खोटा जप्ती पंचनामा तयार करून सोबत पत्र पुरवठा अधिकारी श्रीगोंदा यांचे सही व कारवाईसाठी सदर चा पंचनामा टपालाद्वारे पाठवला होता व पुरवठा अधिकारी श्रीगोंदा यांनी बेलवंडी पोलीस निरीक्षक यांचा अर्ज व पंचनामा बाबत पोलीस निरीक्षक बेलवंडी यांना लिखित कळवले की आपण हॉटेल निसर्गाचे ढाबा मालक गणेश झेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची प्रत जोडलेली नाही सोबत फक्त जप्ती पंचनामा सादर केला आहे सदर पंचनाम यावर कोणत्याही पोलीस अधिकारी यांची सही नसून सदरची कारवाई ही आपले कार्यालयाकडून परिपूर्ण करण्यात यावी असे लिखित पत्राने बेलवंडी पोलीस निरीक्षक यांना कळविले तरी विकत आणलेले डिझेल पेट्रोल पंपावरील फोन पे ने पेमेंट केल्याचे बिल घेऊन गेले असता पुरवठा अधिकारी श्रीगोंदा यांनी सांगितले की हॉटेल निसर्ग येथे तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची डिझेल जप्ती केलेली नाही सदरची कारवाई वरील पोलीस अधिकारी यांनी केलेली आहे वरील सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. बेलवंडी पोलीस स्टेशन डायरी तसेच एलसीबी येथे असणारी नोंद डायरी मध्ये रेड करण्याबाबत नोंद घेणे गरजेचे होते तसेच एलसीबी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिस स्टेशन बेलवंडी यांना रेड कामी पोलीस मदत मागणी करण्याकामी पत्र देणे आवश्यक होते सदर रेड मध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती कायदेशीर गरजेची असताना कोणत्याही महिला पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती सदर बाबत वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश घेणे आवश्यक होता व तहसीलदार व पुरवठा अधिकारी श्रीगोंदा यांना रेड बाबत कायदेशीर कळवणे आवश्यक होते घटनास्थळी करताना पुरवठा अधिकारी किंवा तहसीलदार किंवा गावचे पोलीस पाटील सरपंच याच्या कडून सक्षम हजर असताना पंचनामे करणे आवश्यक होते घटनास्थळी रेड संपल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते परंतु अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्ती पंचनामा करणे आवश्यक होते परंतु असे न करता ७ लाख रुपयांची मागणी मी नकार दिल्यामुळे खोटा व बनावटी जप्ती पंचनामा कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा पुरवठा यांची सही नसताना खोटा पंचनामा तयार करण्यात आला सदरची जप्ती पंचनामा वेळी पुरवठा अधिकारी यांनी सक्षम हजर राहून रेड जप्ती पंचनामा वर सही शिक्के करणे कायदेशीर होते तसेच यावेळी हॉटेलचे मॅनेजर व कर्मचारी यांची सही घेणे गरजेचे होते. नाही का व सदर डिझेल बायो आहे की नाही ते नाशिक येथे नमुना तपासून समजते तसेच हॉटेल चे मालक गणेश झेंडे यांना कायदेशीर नोटीस देऊन सदरचे डिझेल हे कुठून व कसे आले याबाबत लिखित खुलासा अहवाल मागणी करणे गरजेचे होते परंतु आज रोजी पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसून पैसे लाटण्याचा प्रकार केलेला असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू करण्यात आले आहेत.