जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने जल्लोष

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण - अविनाश घुले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द केल्याने जिल्हा हमाल पंचायत चा वतीने जल्लोष केला गेला . गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत असतांना या आंदोलनात 600 लोकांना आपले प्राण गमवावे लागले . मात्र आगामी युपी , हरियाणाच्या निवडणुका लक्षात घेता , केंद्र सरकारने हा निर्णय आज सकाळी जाहीर केला . शेतकऱ्यांच्यादृष्टीने ही चांगली बाब आहे , परंतु जो पर्यंत अधिसूचना निघात नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहील , असे प्रतिपादन हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले .
 केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्याबद्दल नगर जिल्हा हमाल पंचायत येथे हमाल , माथाडी , शेतकरी यांनी जल्लोष करुन पेढे वाढून , फटाके फोडण्यात आले . याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले , उपाध्यक्ष गोविंद सांगळे , शेख रज्जाक , सचिव मधुकर केकाण ,  बाळासाहेब वडागळे , अॅड . सुधीर टोकेकर , अशोक बाबर , विष्णूपंत म्हस्के , अनुरथ कदम , बबन आजबे , नवनाथ बड़े आदि उपस्थित होते .
 अविनाश घुले म्हणाले ,कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण होय. केंद्राने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतले होते , परंतु हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताविरोधात व कंपन्यांच्या फायद्यासाठीच होते . त्यामुळे या कायद्यास देशातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता . त्यासाठी दिल्लीसह विविध राज्यात व नगरमध्येही आंदोलने झाली . या आंदोलनालाही सर्वस्तरातून पाठिंबा मिळाला . त्यामुळे केंद्र सरकारला नाईलाजास्तव हे कायदे मागे घ्यावे लागले आहेत . हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे सांगितले .
याप्रसंगी सुधीर टोकेकर म्हणाले , केंद्राने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारे  होते . त्यांना कंगाल करुन देशाची कृषी व्यवस्था कंपन्यांच्या हाती देण्याचा घाट घातला होता. परंतु सर्वांच्या एकक्षित प्रयत्नाने त्यास विरोध झाल्याने केंद्राला ते कायदे मागे घेण्यास भाग पाडले आहे . हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा दिलासा दायक निर्णय असल्याचे सांगितले .
यावेळी नारायण गिते , लक्ष्मण वायभासे , रविंद्र भोसले , सुनिल गिते , पांडूरंग चक्रनारायण , रामा पानसंबळ , मच्छिंद्र दहिफळे , राजू चोरमले , गणेश बोरुडे , सुनिल गर्जे , विष्णू ढाकणे , युवराज राऊत , लक्ष्मण खंडागळे , तबाजी कार्ले , सचिन राऊत , विष्णू महाजन , अर्जुन शिंदे , आसिफ कादरी , संदिप कोतकर , साहेबराव आजबे आदिंसह कोतकर , साहेबराव आजबे आदिंसह शेतकरी , हमाल , माथाडी बांधव उपस्थित होते .