प्रहार दिव्यांग क्रांति संघटनेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक.

शासकीय विश्रामगृह येथे मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष बाबुराव काने याच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली या बैठक मधे दिव्यांगाचे रोजगार उद्योग घरकुल व अन्य विषयांवर चर्चा झाली. या सर्व विषयाचा पाठपुरावा करुन निकालात काढू असे बच्चूभाऊ कडू म्हणाले .


तसेच रोजगार, उद्योग, घरकुल या साठी प्रहार संस्थेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यानी मागणी केली व अपंगांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी माहिती दिली यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, जिल्हा सचिव हमीद शेख, सहसचि किशोर सुर्यवंशी, शहर उपाध्यक्ष संदेश रपारिया, जिल्हा संघटक राजेंद्र पोकळे, जिल्हा सपर्क प्रमुख राजू भुजबळ, जिल्हा प्रशिद्धिप्रमख नीळकंठ कराड, नगर तालुकाध्यक्ष संजय पुंड, राहुरी ता.अध्यक्ष मधुकर घाडगे, श्रिगोंदा ता.अध्यक्ष हरिभाऊ खामकर, श्रीरामपुर ता.अध्यक्ष गुलाबभाई पठाण, पारनेर ता.अध्यक्ष अरविंद नरसाळे, प्रवाराशहर अध्यक्ष सलीमभाई शेख, राहुरी सचिव योगेश लबड़े,  कराड आदी पदाधिकारी उपस्तीत होते.