पाचपीर चावडी येथे नागरी सुविधांचा बोजवारा
पाचपीर चावडी येथील अंबिका महिला बँकेच्या समोर न्यामत खाणी मोहल्ला येथे मुलभूत नागरी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. पाचपीर चावडी न्यामतखानी मोहल्ला येथे नागरी समस्या असून, कित्येक महिन्यापासून फेस टू च्या कामासाठी रस्त्याची दुर्दशा करून ठेवण्यात आली असून अर्ध्या रस्त्यावर सिमेंट काँक्रेट करण्यात आले असून अर्धे रस्ता तसेच सोडण्यात आलेला आहे.
ड्रेनेजचे पाणी व सांडपाणी नाल्यामध्ये सोडून दुर्गंधीचे प्रमाण वाढत असून रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने चालने देखील कठिण झाले आहे.
या भागात घाणीचे साम्राज्य पसरुन साथीचे आजार पसरले आहे. या मोहल्लयात मुलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असून, या भागात मुलभूत नागरी सुविधा पुरविण्याची मागणी येथील रहिवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच सदर प्रश्नासाठी वारंवार मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर धाक राहिले नसून हे कर्मचारी कामाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे कामगारांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आदेश द्यावे व सदर प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.