प्रहार मुकबधिर संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशनामध्ये विविध प्रश्‍नांवर चर्चा

अहमदनगर:

शहरामध्ये प्रहार मुकबधिर  संघटनेचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात मुकबधिर लोकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. तसेच ते प्रश्न सोडवण्यासाठी कृती आराखडा देखील तयार करण्यात आला.

बंधन लॉन येथे या अधिवेशनाचे आयोजना करण्यात आले होते. त्यासाठी संघटनेचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रहार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश शिंदे, गजानन जगताप, शिवकुमार यादव, जुबेर मुनियार, माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अधिवेशनाचे उद्घाटन झाले.

या अधिवेशनासाठी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक सहकार्य मिळाले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दिपक जाधव, राहुल येनगंदुल, आकाश परभणे, वैभव मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल दिशा जाधव हिने केले.