महानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा नागरी सत्कार समारंभ…

अहमदनगर:  

कल्याण रोड येथिल श्री.छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्या कॉलनी येथे महानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त, कल्याण रोड परिसरातील रहिवाशी आणि महानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने परिसरातील नागरिकांचा नागरी सत्कार करण्यात आला.

ज्यांचे वय 75 वर्षे चालू आहे , व जे 75 वर्षापेक्षा अधिक वय आहे,  असे परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक स्त्री व पुरुष तसेच भारतीय लष्करातील व निमलष्करी दलातून विविध सेवेतून निवृत्त झालेले सर्व सैनिक,  महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले पोलीस या संपूर्ण 75 जणांचा नागरी सत्कार यावेळी  करण्यात आला

यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, उद्योजक एन.बी. धुमाळ, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शामराव नळकांडे, सौ.पुष्पाताई बोरुडे, सौ.विद्याताई खैरे, सौ. सुवर्णाताई जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, दत्ताभाऊ जाधव, प्राचार्य खासेराव शितोळे, दत्ताभाऊ गाडळकर, प्रा.माणिक विधाते, अँड. युवराज शिंदे, पै. महेश लोंढे, पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, लेखा व वित्त अधिकारी रमेश कासार, राजेंद्र पवार, रामभाऊ नळकांडे, सुधीर शेटे, विनायक आडेप, सुरेंद्र पवार, सब इन्स्पेक्टर देवराम ढगे, माणिकराव लगड, लक्ष्मण म्हस्के, दिनकर आघाव, भाऊसाहेब थोटे, बाबासाहेब आंधळे, बबनराव खामकर, सुभाष बर्वे, अंबादास नेटके, पंडितराव हराळ, मोहनराव नागवडे आदीसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण रोड परिसरातील जे कामे झालेली आहे हे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने व पाठपुराव्याने झालेले आहे. त्यामुळे या परिसरात वैभव प्राप्त झाले असून हा उपक्रम जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा समाजाला एक दिशा देणारा उपक्रम  आहे.

तसेच पंडितराव हराळ, तांबडे मेजर, बाळासाहेब मोहारे मेजर, कळमकर गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कल्याण रोड परिसरात लवकरच ग्रेट इंडिया डि.एन.ए‌.फोरम या उपक्रमाची माहिती प्रा.भगवान काटे यांनी देऊन शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती रामभाऊ नळकांडे, पारुनाथ ढोकळे, विजुभाऊ गाडळकर, उत्तमराव राजळे, परशुराम कोतकर, राजेंद्र पवार, भगवान काटे, अभय शेंडगे, शक्ती सोनवणे, बळवंत नागवडे, मदन काशीद, मनोहर गोबरे, ईश्वर नागवडे, रामदास अडसुरे, विलास धाडगे, संजय सोनवणे, पर्वतराव हराळ, नवनीत गायकवाड, सर्जेराव चौधरी, अंबादास नेटके, सुभाष आंबेकर, प्रथमेश सोनवणे, संजीव सातपुते, कल्पना वायकर, विमल मुकणे, संगीता कदम, सुरेखा ढोकळे, मिनाक्षी नागवडे , अरुणा खोपे, सुनंदा पाटसकर, भाऊसाहेब अडसूळ, पंडितराव हराळ, शरद मुळे, शशिकांत तांबे, अँड.शर्मिला खेडकर, ताराचंद भणगे, श्रीधर जाधव, अनिल आठरे, संतोष चौधरी, यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मा. प्राचार्य खासेराव शितोळे सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे व रामदास अडसुरे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन परशुराम कोतकर यांनी मांनले.