पिंपरी-चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल…

पिंपरी-चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने तब्बल तीन वर्षानंतर अॅट्रॉसिटी व जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरण असे की, सुशांत कुमार हे नागपूर निवासी असून ते फायर-सेफ्टी कॉलेजचे संचालक आहेत. व महाराष्ट्र सह विविध राज्यात त्यांचे शाखा आहेत. पिंपरी-चिंचवड येथील लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव लाडे यांना सुशांत कुमार यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांच्या परिवारातील एका महिला सदस्या सोबत आपत्ती-जनक स्थिती मध्ये हॉटेलमध्ये पकडले होते. डॉक्टर लाडे यांनी पिंपरी-चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्याशी मिली-भगत करून सुशांत कुमार यांना फसवण्याची योजना आखली आणि योजनेनुसार जाधव यांनी पदाचा दुरउपयोग करीत त्यांनी नागपूर येथील फायर कॉलेजचे अध्यक्ष डॉ. सुशांतकुमार मेश्राम यांना बेकायदेशीर रित्या चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्यांच्या विरोधात कोणताही प्रकारचा पुरावा नसतांना दोन खोटे गुन्हे दाखल केले होते आणि जातीवाचक शिव्यागीळ व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती .

महत्वाचे म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या महिला कर्मचारी सोबत पोलीस स्टेशनमध्येच अश्लिल व पोलिस खात्याला लाजवेल असा व्यवहार केला होता. जाधव याला याच प्रकरणामध्ये पिंपरी-चिंचवड चे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सखोल चौकशी करून पदाचा दुरूपयोग केल्या प्रकरणी निलंबितसुद्धा केले होते.

सुशांत कुमार हे लगातार जाधव याच्या विरोधात FIR दाखल करण्याची मांग करत होते. शेवटी त्यांनी कोर्टाची धाव घेतली व पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तसेच सर्व पुराव्यांची जाच-पडताळ करून आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आदेश पारित केला. कोर्टाच्या आदेशानुसार चिंचवड पोलीस स्टेशन मध्येच पोलीस निरीक्षक रविन्द्र जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी व जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला.