प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीला मंजूरी
अहमदनगर:
सावेडी उपनगरतील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला मंगळवारी स्थायी समितीने मंजूरी दिली. 18 फूटी चौथर्यावर महाराजांचा 12 फूटी पुतळा उभारण्यात येणार आहे.तसेच आसपासच्या परिसरात सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी 29 लाख रुपये एतका खर्च येणार असून त्यासाठी मंजूरी देखील मिळाली आहे.
स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नगरसेवक संपत बारस्कार, मुदस्सार शेख, प्रदीप परदेशी, पल्लवी जाधव, ज्योति गाडे, आदि उपस्थित होते.
येत्या 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी या कामाचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे यावेळी सभापति कवडे यांनी सांगितले. शासनाच्या कला संचालनालयाच्या मुख्य वास्तु विशारदानीही मंजूरी दिल्याचे अभियंता मनोज पारखे यांनी या सभेत संगितले.
प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या कामाला तत्काल प्रारंभ करावा या मागणीसाठी कृती समितीने दोन दिवस उपोषण केले त्यानंतर मनपाणे पुतळा बसविण्याची जागा बंदिस्त करून निविदा मंजुरीचा विषय सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर अजेंडा घेण्यात आला.