वडार समाजाचे पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर पाटबंधारे येथील कार्यकारी अभियंता व त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारे उपअभियंता यांच्या अधिपत्याखाली काम करणारे सर्व शाखा अधिकारी यांनी ठेकेदारांशी सगममत करून अंदाजपत्रकानुसार कामे केलेली नाही व बोगस पद्धतीने बिले काढून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. या सर्वांच्या चल व अचल संपत्तीची मालमत्तेची व लॉकर्स मध्ये असलेल्या संपत्तीची गुन्हे अन्वेषण शाखा तसेच ई.डी. या विभागामार्फत चौकशी होऊन त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी वडार समाज संघ च्या वतीने उपोषण करताना वडार समाज सेवा संघाचे अध्यक्ष मोहनराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, तुकाराम गुंजाळ, मनोज माने, ज्ञानेश्वर जंगम, किरण तागडकर, रमेश जेठे, रामचंद्र मंजुळे, सागर धनवटे आदी उपस्थित होते.

अधिकारी व शाखा अधिकारी यांनी सन 2019 ते मार्च 2023 पर्यंत सदर कार्यक्षेत्रातील झालेल्या व चालू असलेल्या खर्च दुरुस्ती काटे तोडणे, मुसळवाडी तलावातील कामात गेट बसवणे, चिंच व आंब्याच्या फळाची बोगस पद्धतीने टेंडर काढून केलेली विक्री संबंधित वेगवेगळ्या प्रकल्पाच्या कामात तसेच शासकीय निवासस्थान, शासकीय इमारती, शासकीय विश्रामगृहाची कामे, कॅनॉलची कामे आधी सर्व कामात अंदाजपत्रकानुसार व शासकीय नियमानुसार न करता मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून मोठ्या प्रमाणात बोगस पद्धतीने बिले काढण्यात आली आहेत.

तसेच काही मंजूर संस्थाची व ठेकेदारांची कामासाठी मागणी असताना फक्त मर्जीतील ठेकेदार यांना कामे देऊन गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आलेले असून यासाठी वरील सर्व कामाची व अधिकारी व शाखा अधिकारी यांची पूर्वत चौकशी होऊन कार्यकारी अभियंता व सर्व उपअभियते व शाखा अभियंते यांनी ठेकेदाराशी सगममत करून मोठ्या प्रमाणात अवैद्य मार्गाने गोळा केलेल्या सर्व चल व अचल संपत्तीची व मालमत्तेची गुन्हे अन्वेषण विभाग व ईडी तथा अंमलबजावणी संचालनालय खात्यामार्फत चौकशी करून भ्रष्टाचारी अभियंत्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून वडार समाजाला खुदाई कामासाठी व बांधकामासाठी कामांमध्ये 10 टक्के कामे देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.