भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी…

अहमदनगर: मेट्रो न्यूज     

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार अर्बन बँक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, अभिजीत सपकाळ, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, दीपक बडदे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, अर्जुनराव बेरड, सुभाष होडगे, मच्छिंद्र बेरड, श्यामराव वाघस्कर, संपत बेरड, शरद धाडगे, सदाशिव मांढरे, अमोल धाडगे, संतोष हजारे, शरद धाडगे, सुर्यकांत कटोरे, किशोर भिंगारदिवे, ओम हजारे आदी उपस्थित आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली. शिक्षणची शक्ती त्यांनी जाणल्यामुळे बहुजन समाजासह महिलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नाने महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. मुलींसाठी शाळा काढून स्त्री सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्या समतेच्या विचारांचा जागर त्यांनी केला. त्याचे विचार समाजाला प्रेरणादायी असल्याचे संजय सपकाळ यांनी सांगितले.