राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी संभाजी आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाज सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, आरमार उभे केले, आणि आपला स्वराज्य वाढवला, अशा महान राजाला, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला राष्ट्रीय चर्मकार समाजाचा मानाचा मुजरा अशा शब्दात महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा नगर जिल्हा निरीक्षक राजेंद्र बुंदेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा लताताई नेटके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करायचा आदर्श समाजापुढे ठेवल्याचे सांगितले. तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अहमदनगर जिल्ह्यातील समस्त पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नाशिक येथे होणाऱ्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर करिता करावयाच्या नियोजना संदर्भात ही बैठक आयोजित केली होती.