रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अहमदनगर: मेट्रो न्यूज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन, शिवनेरी चौक, येथे विजय गव्हाळे मित्र मंडळाच्या संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी, आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक विजय गव्हाळे, संकेत गव्हाळे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, ज्येष्ठ नागरिक के.डी. खानदेशी, परिमल निकम, संभाजी पवार, नंदू लांडगे, पप्पू ठोंबरे, महेश सुपेकर, बाळू ठाणगे, अनिल येलमाने, संजय जरबंडी, गणेश शिरसाट, चंदू मामा इंगळे आदी उपस्थित होते.