सामाजिक उपक्रमांने बहुजन समाज पार्टीच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले” यांची जयंती साजरी

युवकांनी महापुरुषांची जयंती ही इतर वायफट खर्च करू नये; उमाशंकर यादव

 अहमदनगर: मेट्रो न्यूज 

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती  बहुजन समाज पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.बहुजन समाज पार्टीच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच  शहरातील अरुणोदय गो शाळेस चारा वाटप देखील करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, शहर बी.व्ही.एफ. आकाश जंजाळ, व्यापारी रवींद्र पुरी, रामभाऊ परदेशी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, पै. अक्षय सांगळे, सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटोळ, उमाशंकर यादव, सुनील ओहळ, आत्तार शेख आदी उपस्थित होते.

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत केली. फुले दांम्पत्यांच्या योगदानाने समाज सावरला असून, त्यांचे कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव  यांनी सांगितले.

युवकांच्या माध्यमातून बदल घडणार असून, युवकांनी महापुरुषांची जयंती ही इतर वायफट खर्च न करता , अशाच विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करावी असे उमाशंकर यादव यांनी आवाहन केले.