सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये महिला दिन साजरा ….
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान...
अहमदनगर : मेट्रो न्यूज
सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.कर्तृत्ववान महिलांच्या यशोमय जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रा. अनुजा अब्दुले, अॅड. गायकवाड, अॅड. अर्चना तरडे, डॉ. नजमा जहीर, अॅड. पी.के. उजागरे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. नजमा, अॅड. तरडे, अॅड. उजागरे, प्राध्यापिका मीरा जानराव, विद्यार्थी प्रतिनिधी लीना कोळपकर, प्रसाद पाटसकर, सचिन जगधने यांनी आपल्या भाषणात महिला शक्तीचे विचार मांडले.आजच्या युगातील प्रगती म्हणजे स्त्री होय. प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवून महिला प्रगतीसाठी मोठे योगदान देत आहेत. प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेळवणारी महिला खर्या अर्थाने कर्तृत्ववान आहे. कुटुंबातील विविध जबाबदार्या पार पाडून माहेर आणि सासर दोन कुटुंबाला प्रकाशमान करणारी स्त्री आहे. सातत्याने धडपड करणारी महिला ही प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभच असते असे प्रतिपादन अॅड. शर्मिला गायकवाड यांनी केले.
संस्थेचे सचिव ना.म. साठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी ताकवले हिने केले. आभार जबीन शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल राठोड, सविता तांबे, विनोद जाधव, सतीश थोरात आदींसह महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.