चरण धुळीमुळे नव्हे विषारी पदार्थांच्या कॅन उघडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली

वाढत्या लोकप्रियतेमुळे रचले षडयंत्र, भोले बाबांच्या वकिलाचा दावा

हातरस येथे दोन जुलै रोजी आयोजित सत्संगाच्या वेळी गर्दीतील काही लोकांनी विषारी पदार्थाने भरलेल्या कॅन उघडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. असा दावा धर्मगुरू भोले बाबा यांचे वकील ए.पी.सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. भोले बाबांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चेंगराचेंगरीचा कट रचण्यात आला. असा आरोप सिंह यांनी केला सिंह म्हणाले, प्रत्यक्षदर्शनी माझ्याशी संपर्क साधला. आणि सांगितले की, पंधरा-सोळा लोक विषारी पदार्थांच्या कॅन घेऊन आले होते. त्यांनी त्या गर्दीत उघडल्या. या संशयतांना पळून जाण्यासाठी घटनास्थळी वाहने उभे होते. आमच्याकडे पुरावे आहेत. असे सिंह म्हणाले. आणि आम्ही ते सादर करू. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या आयोग तपासासाठी आवश्यक असलेल्या कोणाचीही चौकशी करील. आयोगाचे अध्यक्ष आणि अल्हाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी असे सांगितले.