कळसुबाई शिखरावर पर्यटकांनी प्रवेश शुल्क देऊ नये

कळसुबाई शिखर देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय

अकोले : सर्वाधिक उंच व महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या कळसूबाई शिखरावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांकडून मानसी 30 रुपये प्रवेश शुल्क बाबत शुक्रवारी बारी व जहागीरदारवाडी गावात ठराविक लोकांनी ग्रामसभा घेऊन घेतलेला निर्णय बुधवारी कळसुबाई देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत चुकीचा, अयोग्य ठरवला. त्यामुळे कळसुबाई शिखरावर देशभरातून येणाऱ्या लाखो पर्यटक व भाविकांना प्रवेश शुल्क न देताच यापुढेही पूर्वीप्रमाणे प्रवेश मिळेल. अशी माहिती गावचे माजी सरपंच व कळसूबाई देवस्थान ट्रस्ट विश्वस्त तुकाराम खाडे यांनी दिली. या निर्णयामुळे पर्यटकांप्रमाणे नवरात्र, महोत्सव काळात व इतर वेळेस कळसुबाई शिखर व दुर्ग प्रेमींना दिलासा मिळाला आहे.
या सभेत ग्राम पंचायत व देवस्थान विश्वस्त मंडळात विश्वासात न घेताच ग्रामपंचायतीची त्यांचा दुरुपयोग करून बनावट लेटरहेडवर लिहिलेले व मंजूर केलेला सर्व ठराव अवैध समजण्यात यावे. याबाबत बुधवारी सकाळी कळसुबाई देवस्थान विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन शुक्रवारी केलेले ठराव अमान्य केल्याचे जाहीर केले. या बैठकीस बारीचे माजी सरपंच, कळसुबाई देवस्थान विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते. सद्यस्थितीत कळसुबाई, हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांकडून मानसी 30 रुपये व प्रति चारचाकी वाहनावर 100 रुपयांचे प्रवेश शुल्क आकारण्यात येते. या वाहनांची नोंद कर वसुलीची पावती फाडून वन्यजीव विभागाकडून करण्यात येते. हे वाहन व पर्यटकांची वनपरिक्षेत्राच्या मुतखेल, कोलटेंबे व शेंडी टोल नाक्यावरील कार्यरत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नोंद होते. या धरतीवर कळसुबाई शिखरावर वर्षभर येणाऱ्या भाविकांचे नोंद घेऊन मानसिक 30 रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आला होता. मात्र या ठरावाविरुद्ध कळसुबाई देवस्थान विश्वस्त मंडळाकडून चर्चा घडवून तो पर्यटक व भाविकांवर अन्यायकारक असल्याचा दुसरा ठराव मंजूर करून घेतला गेला. दरम्यान कळसुबाई शिखरावर येताना प्रवेश शुल्क देऊ नये. पण सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी, गोंगाट करू नये, देवस्थानचे पावित्र्य जपावे असे आवाहन करण्यात आले आहे.