जास्त कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंक्स ना शाळा परिसरात बंदी
पाचशे मीटर अंतरात विक्री करता येणार नाही
मुंबई : बर्फ, रंग आणि इतर घटक मिसळून तसेच कॅफेनचे प्रमाण वाढवलेले एनर्जी ड्रिंक्स शाळा आणि महाविद्यालयांच्या पाचशे मीटरच्या परिसरात विक्री करणावर सध्या बंदी घालण्यात आलेले आहे. अन्न आणि औषध प्रधानमंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत या संदर्भात माहिती दिली. विधान परिषदेत सत्यजित तांबे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यभर एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेन्स अतिरिक्त प्रमाण असलेल्या एनर्जी ड्रिंक्सची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. या ड्रिंक्समध्ये 250 ml च्या बाटलीत 75 मिली ग्रामपेक्षा जास्त कॅफेन असल्याने नशा येते. मेंदू, किडनीवर परिणाम होऊन अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, चिडचिडेपणाचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात मुलांमध्ये वाढलेलं जास्त कॅफेन असलेल्या एनर्जी ड्रिंक्सला यामुळे काहीसा लगाम घालता येऊ शकतो. पाश्चात्त्य पदार्थांवर आपल्याकडे दिला जाणारा अतिरिक्त भर हा या सर्व गोष्टींमागचे कारण आहे. त्यामुळे एका दृष्टीने जास्त कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंक्सना शाळा परिसरात बंदी घातली. हे चांगलेच आहे. कारण यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. सांगूनही, मुले काही प्रमाणात या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शाळा परिसरात अशा पदार्थांना घातलेली बंदी योग्य आहे.असे मत अनेक पालक आणि शिक्षकांमधून व्यक्त होत आहे