आषाढीत, दुर्घटना प्रतिसाद प्रणालीचा पंढरपूरमध्ये वापर

अनुचित घटना न घडण्यासाठी एनडीआरएफची मदत

मुंबई : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या मेळ्यात कोणताही अनुचित प्रकरण घडू नये, अथवा एखादी दुर्घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या दुर्घटना प्रतिसाद प्रणालीचा वापर केला. तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये चालणाऱ्या या पायी दिंडीमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच भाविकांना तत्काळ सुविधा मिळाव्यात. यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली. आषाढीनिमित्त पंढरपूर आणि परिसरात जमणारा जनसागर विचारात घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वारीदरम्यान निर्माण होऊ शकणारे संभाव्य अडथळे यांचा आढावा, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तयार केला. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दुर्घटना प्रतिसाद प्रणाली जिल्हावार आराखडा तयार करून त्यानुसार वारीसाठी व्यवस्थापन आराखडा आराखडा तयार केला गेला त्यानुसार जिल्हा प्रशासनातील विविध विभागाकडे जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. ‘निर्मलवारी, हरित वारी’ अशी संकल्पना यावर्षी आषाढी वारीसाठी ठेवली होती. त्यानुसार स्वच्छता, पाणीपुरवठा याबाबत प्रशासनाने अत्यंत चोख काम केले. याला या ॲपची चांगली मदत झाली. वारीतील मोठ्या जनसमुदायाला सुविधा पुरवण्यासाठी, पहिल्यांदाच केंद्रीय व्यवस्थापन विभागाच्या दुर्घटना प्रतिसाद प्रणालीचा यशस्वीपणे वापर केला गेला.