जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारात सोन्याची चार कपाटे
'खजिन्यात साप आणि भुयारही नव्हते' त्या सगळ्या अफवा
पुरी : ओडिशातील महाप्रभू जगन्नाथ यांच्या मंदिरातील रत्न, भंडाराचे सोने गुरुवारी बाहेर काढण्यात आले, त्या ठिकाणी चार कपाटे आणि तीन संदुक म्हणून सोने आढळले होते. हे सगळे सोने दुसऱ्या पेटाऱ्यात भरून महाप्रभूंच्या शयन कक्षात सुरक्षित ठेवण्यात आले. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचे सदस्य न्यायमूर्ती विश्वनाथ यावेळी म्हणाले की, चिंता करण्याची गरज नाही, महाप्रभूंचे सगळे भांडार सुरक्षित आहे. रत्न भांडारात जाड काचेच्या तीन आणि एक लोखंडी कपाट होतं. याशिवाय मंदिर प्रशासक व समिती सदस्य अरविंद यांनी सांगितले की, आतील रत्न भांडारात साप दिसले नाहीत किंवा भुयारही मिळाले नाही, या सगळ्या अफवा होत्या. सोने व आभूषणाची यादी आणि त्यांचा हिशोब याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही, स्नेक हेल्पलाईनचे सदस्य सुर्वे यावेळी म्हणाले, आम्ही पूर्ण वेळ भांडार कक्षेच्या बाहेरच हजर होतो. याशिवाय तीन फूट उंच आणि चार फूट रुंद लाकडाच्या दोन आणि लोखंडाचा एक पेटारही या ठिकाणी होता. या सर्वात केवळ सोने साठवलेले होते. कपाट व पेटारे एवढे वजनदार होते की, समितीच्या 11 सदस्यांना ते हलवताही आले नाही. तेव्हा बाहेरून रिकामे पेटारे आणून संपूर्ण सोने त्यातून हलवण्याचे ठरवले. त्या सगळ्या कामासाठी सात तास लागले. जगन्नाथ संस्कृती तज्ञ भास्कर मिश्रा यावेळी म्हणाले, बाहेरच्या कक्षात मिळालेल्या रत्नांचा हिशेब लावणे सोपे काम नाही. पण दोन्ही भंडारात मिळालेल्या सोन्याचे एकूण, अंदाजे मूल्य 100 कोटी रुपयांत जास्त असू शकते.