मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाऊन झाल्याने साडेसात हजार कंटेनर नोंदणीच्या प्रतीक्षेत
एक कंटेनर गेट मध्ये सोडण्यासाठी अर्ध्याऐवजी लागत होते 13 ते 14 तास
नाशिक : मायक्रो मायक्रोसॉफ्टचे सर्वर डाऊन झाल्याचा फटका शुक्रवारी जेएनपीटीलाही बसला. त्यात गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकणात होत असलेल्या पावसामुळे जवाहर नेहरू पोर्टवर कंटेनर आणि निर्यात होणारा भाजीपाला व इतर वस्तूंची ऑनलाईन नोंदणी रखडली गेली. दुपारपासूनच एक कंटेनर गेटमध्ये सोडण्याआधी 1/2 तासाऐवजी 13 ते 14 तासांचा विलंब होऊ लागला. परिणामी पोर्टबाहेर सुमारे 7500 कंटेनर नोंदणीच्या प्रतीक्षेत उभे राहिले होते. महाराष्ट्रसह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा येथील भाजीपाल्यासह इतर वस्तूंची जेएनपीटीहून परदेशात समुद्रामार्गे निर्यात होत असते. सर्वोच्च तांत्रिक अडचण व मुंबईतील पावसामुळे पोर्टवरील कार्यप्रणाली संथ गतीने सुरू होत. त्यामुळे या नोंदणी प्रक्रियेला विलंब होत होता. आणि कंटेनरची सध्या लागलेली रांग पाहता ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून दोन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. असे मत एका निर्यातदाराकडून व्यक्त झालेले आहे.