तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम काल अचानक ठप्प
प्लान बी असणे, गरजेचे
नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सेवेतील त्रुटीमुळे शुक्रवारी संपूर्ण जग जणू थांबलं होतं. मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून असलेल्या जगभरातील 95% संगणकाने अचानक काम बंद केल्याने जगात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व सेवा जागेवर तात्काळ ठप्प झाल्या. भारतासह अनेक देशांमध्ये 2000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळावर हाताने काम करावे लागत होते. या हँग मुळे रेल्वे आणि मेट्रोसेवा प्रभावीत झाली होती. त्यामुळे हे आयटी इतिहासातील सर्वात मोठे संकट बनले आहे. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता हा त्रास सुरू झाला. मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरसाठी सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या क्राउड स्ट्राइकने अँटीव्हायरस अपडेट जारी केले होते. यानंतर विंडोज वापरकर्त्यांचे संगणक बंद किंवा रिस्टार्ट होऊ लागले. संध्याकाळी उशिरा मायक्रोसॉफ्ट सांगितले की, लवकरच तोडगा अपेक्षित आहे क्रशमुळे डाटा रिकव्हरत काही अडचणी निर्माण झाल्या आहे. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये एअरलाइन्स, बँकिंग आणि एटीएम कंपन्यांच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला. ब्रिटनमध्ये तर टीव्ही प्रसारणही बंद पडले होते. मायक्रोसॉफ्टकडे प्लान बी उपलब्ध नव्हता. ती स्वतः सायबर सिक्युरिटी फॉम त्रुटी दूर करेल, याची वाट पाहत राहिली. ही अत्यंत धोकादायक स्थिती सध्या आहे नआर्थिक प्रणालीचे महत्त्वपूर्ण घटक मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिमवर जास्त अवलंबून असतात. असे नाही की, पर्याय नाहीत अनेक कंपन्या लिनक्स किंवा मेक वापरतात. परंतु एअरलाइन्स आणि इतर उद्योगांनी असे गृहीत धरले की, मायक्रोसॉफ्टमध्ये काहीही चुकीचे होऊ शकत नाही. देशात पर्यायी कार्यप्रणालीचा विकास गांभीर्याने करण्याची हीच वेळ सध्या निर्माण झालेली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि यूपीआयसारख्या प्रणालीची स्थापना आमच्या क्षमता दर्शवते. 95 टक्के संगणक मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर सध्या चालतात. यावर पर्याय शोधण्याची गरज आता खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. शुक्रवारी अनेक संस्थांकडे किंवा ठप्प पडलेले सेवांकडे दुसरा कुठलाही पर्यायी प्लान बी नसल्याने त्यांना मायक्रोसॉफ्टवरच अवलंबून राहावे लागले. पर्यायाने अनेक सेवा तत्काळ बंद करण्यात आल्या. त्यामुळे पर्याय असणे हे अत्यंत गरजेचे आहे.