आपला भारत हा देश कृषिप्रधान असून इथली बहुसंख्य जनता ही शेतीव्यवसायावर जीवन जगत आहे. सध्या पावसाळा सुरु असून काही भागात पावसाचा जोर कायम आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच पिकांवर रोग पडल्याची उदाहरणे आज वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. या पावसाळ्याव्यतिरिक्त शेतकऱ्याला उरलेल्या दिवसातही अनेक विवंचनांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये बी बियाणांचे, खतांचे वाढते दर यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागतात . मात्र आता राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत साडेसात एचपीपर्यंतच्या कृषिपंपांना पुढच्या पाच वर्षापर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ७८ हजार ग्राहक साडेसात एचपीपर्यंत वीज वापरतात. अशा शेतकऱ्यांना एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या वीजबिलमाफीसाठी येणारा खर्च राज्य सरकार महावितरणला देणार आहे. फक्त मोफत वीज देताना वीज वितरण किमान पिकांना पाणी देणाइतक्या वेळ तरी राहील याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
Next Post