अहमदनगरमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड

111 टाक्या जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या वारुळात वारूळवाडी शिवारातील रेफिलिंग सेंटरवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 111 रिकाम्या टाक्या जप्त केल्या तरी फिलिंग करणाऱ्या तिघांना यावेळी अटक करण्यात आली असून साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारूळवाडी शिवारात घरगुती सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक टाक्यांमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात होती. अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार आहेर यांनी पथकासह रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला असता, काहीजण लाल रंगाच्या टाकीतून गॅस काढून तो निळ्या रंगाच्या टाकीत भरताना त्यांना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता घरगुती वापराच्या गॅस टाकी विकत घेऊन गॅस रिफिलिंगचा व्यवसाय ते अनेक वर्ष करत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी झडती घेत असता दीड लाख रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या घरगुती वापराच्या रिकाम्या टाक्या त्यांना आढळल्या. तर एक लाख 24 हजार रुपये किमतीच्या भारत कंपनीच्या व्यावसायिक वापराच्या 31 रिकाम्या टाक्या त्यांना यावेळी सापडल्या. याशिवाय वजन, काटे, रिफिलिंग मशीन, मोटार असा एकूण 6 लाख 65,000 चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मुळात गॅस एजन्सीकडून डिलिव्हरी बॉय मार्फत एकच टाकी दिली जात असते. टाकी हवी असल्यास आधी ऑनलाइन बुकिंग करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर डिलिव्हरी बॉय घरी टाकी आणून देतो. त्याची नोंद रीतसर पद्धतीने पुस्तकात केली जात असते. मात्र दुसरीकडे रिफिलिंग सेंटर चालकांकडे एकाच वेळी 50 ते 100 टाक्या सापडतात. या टाक्यात यांना मिळतात कशा? असा प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.